“सदगुरु साखर कारखान्याने रुपये शंभर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करून” दीपावली केली गोड “या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंदी आनंद”
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
पिलीव / रघुनाथ देवकर:-सांगली सातारा , सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या व एक तपाहून जास्त शेतकऱ्यांच्या सेवेत असलेल्या सदगुरु श्री. श्री .साखर कारखान्यास सन 2025-26 मध्ये गळीतास आलेल्या उसाचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती दीपावली साठी शंभर रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करून शेतकऱ्यांची दीपावली गोड करण्याचा अतिउत्तम निर्णय घेतलेला आहे. निर्णयाचे गावोगावी शेतकरी व ऊस उत्पादक सभासदांनी फटाक्या फोडून स्वागत व अभिनंदन केले. व सद्गुरु श्री. श्री. साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ यांना धन्यवाद दिल्याचे समजते.

भविष्यात सुद्धा आमच्या कारखान्याकडे गळीतास आलेल्या उसाबाबत आम्ही नेहमी शेतकऱ्यांचे हित समोर ठेवूनच निर्णय घेत राहणार आहोत . तरी आपल्या सद्गुरु श्री .श्री. साखर कारखान्याला चालू वर्षी सुद्धा जास्तीत जास्त ऊस गळीतास पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन एन .शेषागिरी राव, व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, कार्यकारी संचालक उदय जाधव व सर्व संचालक मंडळांने केले.