अकलूज जिल्हा परिषद शाळेत “गुढी पाडवा पट वाढवा” हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/03/2026 :
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर 2 व मुली नंबर 3 गणेशनगर अकलूज या शाळेत “गुढी पाडवा पट वाढवा” हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.
शाळा मराठी माझी शाळा मराठी हो…जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले 2 व मुली 3 अकलूज येथे प्रवेशोत्सवा अंतर्गत आज शैक्षणिक गुढी उभारण्यात आली.रांगोळीच्या पायघड्या,फुग्यांची सजावट, डोक्यावर मुकुट,सेल्फी पॉईंट, पहिल्याच दिवशी स्कूल बॅग, गुणवत्तेची गुढी,गोड खाऊ आणि हलगीच्या तालावर मुलांचे झालेले स्वागत.या उपक्रमामुळे मुले आणि पालक खूप आनंदी झाले होते. पालकांनी आपल्या मनोगतातून मराठी शाळेचे महत्त्व सांगितले.सर्व शिक्षकवृंदांच्या कल्पनेतून साकारलेला आजचा प्रवेशोत्सव अविस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाप्रसंगी मुले 2 च्या मुख्याध्यापिका श्रीमती सुकुमारी अंगुले,श्रीमती मनीषा बळवंतराव ,श्रीमती अंजली अडाणे ,दत्तात्रय गायकवाड,तय्यब शेख,श्रीकांत राऊत,श्रीमती फातिमा मुलाणी ,श्रीमती हजराबी बांगी तसेच मुली तीन शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कोरे,महादेव नागणे,श्रीमती रेखा कोळी , श्रीमती सुरेय्या कोरबु ,पांडुरंग मोहिते,समीर कोरबू,श्रीमती वर्षा राणी जाधव,करीना शेख व शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.