संघटन सृजन अभियानांतर्गत विधानसभानिहाय बैठकीचे आयोजन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/04/2026 :
काँग्रेस पक्ष संघटना बुथ स्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने “संघटन सृजन अभियान” हाती घेतले आहे. यासाठी AICC चे निरीक्षक देबासिस पटनायक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा सोलापूरचे प्रभारी मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा निरिक्षक यशराज पारखी, भाऊसाहेब आजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत खालील विधानसभेच्या बैठका होणार आहेत.
बैठकाचे वेळापत्रक
मंगळवार दिनांक 7/4/2026
सकाळी 10:30 वाजता पंढरपूर तालुका कार्यकर्त्यांची बैठक स्थळ – शासकीय विश्राम गृह पंढरपूर. दुपारी 1:30 वाजता.सांगोला तालुका कार्यकर्त्यांची बैठक स्थळ- सांगोला.
दुपारी 3:30 वाजता माळशिरस तालुका कार्यकर्त्यांची बैठक स्थळ-शासकीय विश्रामगृह माळशिरस.
तरी सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,तालुका, ब्लॉक, शहर अध्यक्ष, फ्रंटल, सेलचे विभागाचे जिल्हाध्यक्ष, तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य, नगरपरिषद, नगरपंचायतीचे आजी/ माजी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी वरील वेळेप्रमाणे आपल्या विधानसभा मतदारसंघातील,तालुक्यातील बैठकीस उपस्थितीत रहावे असे आवाहन सातलिंग शटगार
(जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी) यांनी केले आहे.