विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 09/04/2026 :
अगदी लहान असल्यापासून आपल्याला *माझे* ही सवय लागते. हातातील वस्तूचे महत्व समजत नसले तरी घट्ट पकडून ठेवायची, सहजासहजी कोणाला द्यायची नाही. आपण लहान असल्याने घरातल्यांना त्याचे कौतुक वाटते.
मोठे होत जाऊ तसे घासातील घास दुसऱ्याला देण्याची सवय लागते. लहान गोळीसुद्धा चिमणीच्या दाताने तोडून चारजण खातो. एकमेकांच्या वस्तू वापरतो, कपडे वापरतो. *माझे चे आपले* होते.
मुलांनो, जीवनात हेच खूप महत्वाचे आहे. मी केंद्रित राहण्यापेक्षा आपण, आपले म्हणून राहण्याने आपलेपणा वाढतो. न कळत एकमेकांशी भावनिक नाते जुळते. ओढ वाढते व सामाजिक सलोखा निर्माण होतो.
सारे भारतीय माझे बांधव आहेत! ही भावना त्यामुळे बळकट होते.
सौ. स्नेहलता स. जगताप.