श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे यांचे वार्धक्याने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/05/2026 :
नायकुडे वस्ती, मायाक्का कॉलनी संग्रामनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे (वय 93 वर्षे) यांचे रविवार दिनांक 10/05/2026 रोजी पहाटे राहते घरी वार्धक्याने निधन झाले. त्यांचे पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. अत्यंत धार्मिक, मनमिळावू, सुस्वभावाच्या श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे यांचे अकस्मात निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
कै.श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे यांचे पार्थिवावर अकलाई स्मशानभूमी अकलूज येथे आज (दि.10) सकाळी 10 वा. अंतिम दाह संस्कार करण्यात आले.