पंढरपुरात सप्ताहाच्या शिल्लक निधीतून लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट ला १ लाखाची देणगी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान, करंजे येथून)
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 06/06/2026 :
पंढरपूर येथे जगद्गुरु श्री तुकोबाराय निजधाम सेवा संस्थेच्या वतीने नुकताच ६५ एकरमध्ये सकल संत सप्ताह उत्साहात पार पडला. या सप्ताहाच्या आधी श्री छोटे माऊली यांनी श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान नीरा नरसिंहपूर येथे येऊन देवस्थानला भेट दिली होती.


यावेळी देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त अभयकुमार पांडुरंग वांकर यांच्या हस्ते श्री छोटे माऊली यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नीरा नरसिंहपूर येथील ह. भ. प. आनंद महाराज काकडे हे उपस्थित होते.
या सप्ताहासाठी भाविक आणि भक्तांकडून मिळालेल्या देणगी रकमेतून सर्व खर्च करून शिल्लक असलेल्या रक्कमेतून ₹१,००,०००/- (एक लाख रुपये) इतकी रक्कम आज संस्थेच्या वतीने श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट येथे देणगी स्वरूपात चेक द्वारे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट तर्फे संस्थेतील प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला…ही देणगी देवस्थानला देण्यामध्ये माळेगावचे सरपंच तुकाराम पाटील यांचे मोठे योगदान आहे.