वाट कसली बघतस बाबा
घे आता तूं पडान …
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/06/2026 :
आंबे झाले काजी सरले
रतांबे गेले गळान…
वाट कसली बघतस बाबा
घे आता तूं पडान …
बाजारात्सून कोट हाडलय
बूट ठेवन चप्पल काढलय
चाकरमानी मुंबयक गेलो
मिरगय गेलो सरान…
वाट कसली बघतस बाबा
घे आता पडान…
तुझा येवचा नक्की ठरला
म्हणान मळ्यात जॉत धरला
तुझ्या भरवश्यार भातव आता
पेरला न्हय रे व्हरान …
वाट कसली बघतंस बाबा
घे आता तू पडान…
शेणी भरली, लाकडा भरली..
माच करुन कुडी घातली..
खोप शिवान झाली आता
झाला भरुन सराण…
वाट कसली बघतंस बाबा
घे आता पडान…
बेडकां आरडान आरडान दमली
कुर्ली बिचारी बिळातच सुकली
गटार व्हाळ तळी आमची
जावंदे सगळा भरान…
वाट कसली बघतंस बाबा
घे आता पडान…
पोस्ट क्रेडिट ©® सुधीर गोसावी
( काळसे , ता.मालवण , सिंधुदुर्ग )