डॉ. अमर चौरे यांची 354 पोस्को अंतर्गत गुन्ह्यातून निर्दोष सुटका
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/06/2026 :
बौद्धचार्य विपसनाचार्य, माय रमाई फाऊडेशन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष डॉ. अमर भगवान चौरे यांची 354 पोस्को अंतर्गत गुन्ह्यातून वडगाव मावळ कोर्ट जिल्हा न्यायालयाने डॉ अमर चौरे यांची भा द वि कलम 354 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 8 व 11अन्यव्ये शिक्षेस पात्र गुन्हा केल्याचे सिद्ध झाले नाही म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 235 ( 1 ) अन्वये त्यांची निर्दोष मुक्तता केली. डॉ अमर चौरे (राहणार भिमनगर कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे) हे गेले 27 वर्ष समाजाची अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत असताना त्यांची चांगली प्रतिमा मलिन करण्याचे कार्य होत होते. पण न्यायदेवता वर त्यांचा विश्वास होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वडगाव मावळ पिठासीन अधिकारी राजेंद्र व्हि हुद्दार यांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष सरकारी अभियोक्ता ॲड लालचंद ओसवाल यांनी काम पाहिले व चौरे यांचे वकील ॲड. रेखा विश्वास चौरे यांनी त्यांचे वकील म्हणून काम पाहिले.