वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे अकलूज दिनांक 08/07/2026
संग्रामनगर – अकलूज (नायकुडे वस्ती शेजारी) येथे सौ. उज्वला व श्री विकास विजय शेंडगे यांच्या अविज या नवीन वस्तूचा वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ सोहळा बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी संपन्न झाला.
यानिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला या निमित्ताने आलेल्या सर्वांचे समस्त शेंडगे परिवाराच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आला.