प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणुन सुखा पेक्षा, समाधान शोधा, आयुष्य खूप आनंदात जाईल
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/7/2026 :
काही काही व्यक्ती आणि त्यांचं व्यक्तिमत्त्वही असे असतात की, प्रत्येक भेटीत त्यांचा एक नवा पैलू दिसतो. त्या क्षणी त्यांची एक नवी ओळख होते. यश, पैसा, प्रसिद्धी हे सगळं उत्तमच असतं, पण तुमचा आनंद, शांतता आणि स्थिर चित्तता यांच्यापुढे काहीच मोलाचं नाही.
अंतिम सत्य हेच की, माणसांना माणसाचीच गरज आहे. बाकी प्राॅपर्टी, बंगले, पैसा, हे सर्व खोटं, कारण हे गेल्यावर पुन्हा मिळवता येतात, पण हातातुन निसटलेली माणसं जशीच्या तशी पुन्हा मिळवता येत नाही.
प्रत्येक फुलाच्या नशिबात देवाची पायधूळ नसते आणि सर्वात जास्त सुगंध देणारी पारिजातकाची फुले सुद्धा पायदळीच तुडवली जातात. पण तरीही ती ओंजळीना आणि पायदळी तुडवणाऱ्या पायांनाही सारखाच सुगंध देतात. कदाचित ती आपल्याला शिकवून जातात की पुढच्याला वागायचं तसं वागू देत. पण तू मात्र तुझ्या चांगुलपणाच्या सुगंधावर ठाम रहा.
जगांत तीन मुख्य आश्चर्ये आहेत. आपण जन्मभर ज्या मी बरोबर राहतो, त्याचें स्वरूप आपल्याला कळत नाही. जीवनाचें सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारें करतो, ते मन आपल्या ताब्यात येत नाही. क्षणोक्षणीं प्रपंचात सुख नाही अशी सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणी तयार नाही, हे तिसरें आश्चर्य होय.
शेवटच्या घावात दगड तुटतो, याचा अर्थ असा होत नाही, की आधीचे घाव महत्वाचे नव्हते, यश मिळविण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्वाचाच असतो, जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास.
एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच. पण तसे नाही केले तर तुम्हालाच अधिक दुःख मिळेल. आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही. तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. तुम्ही कोण आहात अथवा तुमच्याकडे काय आहे, यावर आनंद अवलंबून नाही. तर, तुम्ही नक्की काय विचार करता आणि त्यावर काय कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे.
जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद. बरंच काही असण्यात आनंद नाही, तर असलेल्या गोष्टी वाटण्यात आनंद आहे. कोणत्याही गोष्टी वाटल्याने आनंद कमी होत नसतो तर तो वाढतो.
मदत एक अशी गोष्ट आहे की, केली तर लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात. रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही; त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते. पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते; आणि मनाला झालेली जखम आयुष्य कसे जगायचे हे शिकवते.
कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं. कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात. प्रवाह रुंदावत जातो.
प्रामाणिकपणा आणि चुकलेपणाची जाणीव असलेली असंख्य माणसं असतात. पण मोकळेपणी मान्य करायचं धाडस ही दुर्मिळ गोष्ट आहे ते धाडस आल्यावर शत्रुत्वातुन मैत्रीचाही जन्म होऊ शकतो.
माणूस नावाच्या एका अवाढव्य, अनाकलनीय यंत्राचा सेफ्टी वॉल्व्ह म्हणजे शब्द आणि संवाद आहे.
दुःखात फक्त एकच बोट आपले अश्रू पुसते आणि आनंदात दहाही बोटे एकत्र येऊन टाळ्या वाजवतात. जर आपले स्वतःचे अवयव असे वागत असतील तर जगाकडून आपण अपेक्षा तरी का ठेवायची.?
एका माणसाच्या समस्येवर दुसर्या माणसाजवळ उत्तरच नसतं, कारण सल्ला देणारा त्या समस्ये पर्यंत पोचू शकत नाही. तो स्वतःच्या वैचारिक पातळीप्रमाणे त्या समस्येकडे पाहतो समस्येतून जाणार्या माणसाच्या भूमिकेत तो जाऊ शकत नाही.
निर्माण होणाऱ्या भावना प्रकट करायच्या नाहीत हे अंगवळणी पाडून घेता घेता कातडीचं चिलखत कधी होतं हे स्वतःलाही समजत नाही.
बोलणी फिसकटली की मोडतो व्यवहार, प्रेम नव्हे.
काही काही शब्द, वाक्य विधानं फार भयंकर असतात ती मोघम असतात. पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद साथीचा रोग पसरवण्याऱ्या जंतुपेक्षा अफाट असते.
मस्तक थोडं वाकवून बघा अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा दगडी मन ही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेऊन बघा दुःखाचा काळ निघुन जाईल. इच्छा थोड्या कमी करून बघा आनंदाचं जग दिसू लागेल.
विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात शिरला कि जीवन संपवतो. आणि गैरसमजूतीचा एक शब्द कानात शिरला कि भली भली नाती संपवतो.
समाजातील लबाड, विश्वासघातकी लोकांपासुन सावध व दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.
दिनेश विष्णु ढोले. पूणे
98503 25069
संकलन : प्रविण सरवदे, कराड
====================