8 ऑगस्ट रोजी महिलांसाठी मोफत कर्करोग निदान शिबिर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/7/2026 :
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त शनिवार (ता.८ ऑगस्ट) रोजी महिलांसाठी मोफत कर्करोग निदान शिबिर जिजामाता कन्या प्रशाला येथे आयोजित केले असल्याची माहिती सयाजीराजे मित्र मंडळ अकलूज चे संस्थापक अध्यक्ष, नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी केले.
सयाजीराजे मित्र मंडळ, शंकरराव मोहिते पाटील चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट, शिक्षण प्रसारक मंडळ, सहकार महर्षि साखर कारखाना आणि बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्यावतीने आयोजित शिबिराबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत मोहिते पाटील बोलत होते. यावेळी डॉ. अभिजीत राजेभोसले, डॉ. अरुंधती खराडे पाटील, कार्यकारी संचालक सुहास यादव उपस्थित होते.
या शिबिरात महिलांची तपासणी तज्ञ महिला डॉक्टर करणार असून महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, छातीचा कॅन्सर व हिमोग्लोबिन तपासणी मोफत होणार आहे. पुढील उपचार नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल येथे मोफत करण्यात येणार आहे
शिबिरात सहभागासाठी महिलांनी प्रा. गौरव देशपांडे ८२०८८९०७४३, प्रा. रविकांत देशमुख ९७६३६३६६६३, यशराज सूर्यवंशी 78 75 67 3309 , अभिषेक शिंदे 9503172509 या क्रमांकावर नाव नोंदणी करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.
“ग्रामीण भागातील महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. महिलांनी मनात भीती न बाळगता तपासण्या करून घ्याव्यात. कर्करोगावर प्राथमिक स्तरावर उपचार केले तर नक्कीच बरा होतो”.
– सयाजीराजे मोहिते पाटील, नगरसेवक