सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचा सन्मान
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/08/2026 :
अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवी भंडारा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या आरतीनंतर ग्राम प्रदक्षिणेला पालखी निघण्यापूर्वी प्रथम श्री अकलाई देवी मंदिरात आणि नंतर श्रींची पालखी दर्शन घेतल्यावर अकलूज वैभव आणि वृत्त एकसत्ताचे संस्थापक संपादक, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांना मानाचे श्रीफळ देऊन सन्मान करताना मदन केशव गुरव दिसत आहेत.

याप्रसंगी मानकरी शशी फुले, अभिषेक नंदकुमार गुरव, प्रेस फोटोग्राफर व पत्रकार संजय शरद लोहकरे, पत्रकार सुनील ज्ञानेश्वर कांबळे, अद्वैत गुरव, अक्षय गुरव, अनिरुद्ध गुरव, श्री अकलाई देवी काठीचे मानकरी लावंड परिवार, आराधी, गोंधळी, किन्नर इत्यादी भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.