‼️ रानभाजी : शेवळा ‼️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 2/8/2026
शेवळा (शेवळे) ही भाजी आरोग्यवर्धक बहुगुणी आहे. या भाजीला इंग्रजीत ‘ड्रॅगन स्टॉक याम’ म्हणतात. दाट जंगलात उगवणाऱ्या, सर्वत्र उपलब्ध न होणाऱ्या या भाज्या म्हणजे पर्वणीच असते. एका मर्यादित कालवधीत उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या पोषक गुणांची खाण म्हणून ओखळल्या जातात. त्यातील शेवळाच्या भाजीला विषेश पसंती आहे.
शेवळाची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात ‘ड’ जीवनसत्व असल्याने स्त्रियांच्या आरोग्यासाठी ही भाजी विशेष महत्त्वाची मानली जाते. ही भाजी डोंगराळ भागात दाट जंगलात येते. त्याची शेती करता येत नाही. ही भाजी एका देठा सारखी दिसते. गावाकडच्या बाजारात ही भाजी मिळते. गुणांनी पौष्टिक असलेली ही भाजी केवळ सात ते दहा दिवसच उपलब्ध असते. या रानभाजी मध्ये आतड्यातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्याची क्षमता असते. ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्यामुळे शेवळाची भाजी या दिवसात नक्कीच खा. नंतर परत ती वर्षभर मिळणार नाही.
शेवळा भाजीला जंगली सुरण या नावानेही ओळखले जाते. तिच्या आरोग्यवर्धक गुणामुळे आहारात पावसाळ्याच्या दिवसात या भाजीला मोठे महत्त्व आहे. शेवाळाची पौष्टिक भाजी बनवण्यासाठी अनेक व्हिडियो युट्युब वर उपलब्ध आहेत. त्यातील एक लिंक पुढे दिली आहे. तेव्हा या पावसाळी रानभाजीचा मनसोक्त आनंद घ्या नि तंदुरुस्त रहा.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण