गणपतीची मुर्ती कशी असावी ?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/9/2026 :
बरेच जण आता आपल्या घरी बाप्पाला आणण्यासाठी मूर्ती बुकिंग करायला जातात तर त्यामध्ये काय पाहिलं जावं याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे.
१) गणपती सव्वा फुटांपेक्षा जास्त मोठी मुर्ती नसावी व मूर्ती बसलेली असावी ,
२) मुर्ती एका व्यक्तीला सहज उचलुन नेता व आणता आली पाहिजे असे वजन असावे , पूर्वीच्या काळी खुळी समजूत होती की दरवर्षी मूर्ती दोन तीन इंच उंची वाढवत होते. मूर्तीची किम्मत वाढवली तरी चालेल पण उंची व वजन वाढऊ नये.
३) सिंहासनावर किंवा लोडाला टेकुन बसलेल्या व एक हात घेणारा व दुसरा हात आशीर्वाद देणारा व विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम मानली जाते .
४) साप, गरुड, मासा, किंवा युद्ध करतांना व चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये,
५) शिवपार्वती च्या मांडीवर किंवा खादयावर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये तसेच गणपतीचे ओरिजिनल रूपात मूर्ती असावी ती इतर कोणाच्याही म्हणजे साईबाबा, स्वामी समर्थ ई.रूपात नसावी कारण गणपती हे आराद्य दैवत आहे बाकी सर्व नंतर. कारण शिव पार्वती ची पुजा लिंगस्वरुपातच केली जाते शास्त्रात मुर्ती निषिद्ध आहे,
६) गणेश मुर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून किंवा पुर्ण झाकून घरी आणूनये गणपती बापाला व इतर कोणत्याही देवाला कधीही कोणाची नजर लागतं नाही.
७) गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मुर्ती मधे देवत्व येत नाही,
तोवर ती केवळ मातीची मूर्ती समजावी. विधीवत ब्राम्हणांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करावी,
८) मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याअगोदर काही कारणास्तव मुर्ति भंग झाल्यास अजिबात घाबरू नये, त्या मुर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरीत विसर्जन करावे, व दुसरी लहान मुर्ती आणुण प्रतिष्ठापना करावी, मनात कोणतेही भय व शंका आणुनये बाप्पाची माफी मागून नवीन सुरवात करावी व काळजी घ्यावी .
९) कुटुंबात किंवा नात्यात मृत्यु झाल्यास सुतकात घरातील व्यक्ती ऐवजी, शेजारी, मित्रमंडळी यांचे करवी पुजा नैवेद्य दाखवून घ्यावा, गणपती विसर्जनाची घाई करू नये आरामात मनातून सुखकर्ता व घालीनोटांगन अशा दोन आरत्या बोलून शांततेत विसर्जन करावे.
१०) गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये.
११) गणपती ला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो, केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत, दही+साखर+भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे.
१२) कोकणात मालवण भागात गौरी सणाला गौराईला मटणाचा नैवेद्य दाखवला जातो, ही अत्यंत विकृत प्रथा आहे, गौरी ही साक्षात आदिशक्ती पार्वती आहे, पार्वतीला निषिद्ध पदार्थांचा नैवेद्य दाखवून राक्षसी उपासना करू नका, मुर्ख प्रथा बंद कराव्यात.
१३) विसर्जन मिरवणूक काढतांना टाळ मृदंग अभंग, भजन म्हणत परमात्म्याला प्रेम भावनेने हसतहसत निरोप द्या,
अश्लील नृत्य व कर्कश डीजे लाऊच नका, गाणी वाजवून विकृत चाळे करू नका ! तसेच दारूड्याना सभोंवतालीही येऊ देऊ नका. आणि वरील गोष्टी जर जमणार नसतील तर गणपती बसवून त्याची विटंबना करू नका ही नम्रपाणे विनंती.
हौस म्हणून गणपती बसवू नका हा भातुकालिचा खेळ समजू नका त्यासाठी काही वैदिक व भावनिक जबाबदाऱ्या असतात त्या काळजीपूर्वक पार पाडव्या लागतात. शास्तरोक्त आरती दोन्ही वेळेस वेळेवर झाल्या पाहिजे तसेच घरातील सर्व सभासदाची उपस्तिथी अवश्य आहे नाहीतर घरातील एक जण काशितरी एक दोन आरती करायची म्हणून करतात बाकीचे भाहेर भटकत असतात म्हणून बरेच जण दीड दिवसाचा गणपती बसवितात , घराची साफसफाई ठेवणे, त्या घरात वादविवाद होऊ नये याची काळजी घ्यावी.