दिनांक 15 रोजी “सहकार महर्षि” च्या ६५ व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/9/2026 : माळशिरस तालुक्यातील शंकरनगरच्या सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त सकाळी १० वा. संचालक विराज निंबाळकर व त्यांच्या पत्नी सौ. विशाखा निंबाळकर यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना सभासद, शेतकरी, कामगार, अधिकारी तसेच हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील,कार्यकारी संचालक सुहास यादव,व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख, संचालक मंडळ, अधिकारी व कामगारांच्या वतीने करण्यात आले आहे.