“स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त नोकरी नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याची प्रक्रिया आहे” – ॲड. अल्ताफ बादशाह आतार
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/9/2026 :
“स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त नोकरी नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याची प्रक्रिया आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कमी नाही, फक्त योग्य दिशा हवी आहे.” असे मत माळशिरस येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे ॲड. अल्ताफ बादशाह आतार यांनी व्यक्त केले.
डॉ. श्री. आप्पासाहेब देशमुख सामाजिक बहुउद्देशीय संस्था संचलित श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, माळशिरस येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुढे बोलताना त्यांनी 1) ध्येय निश्चिती, 2) वेळ व्यवस्थापन, 3) सातत्य, 4) वाचन व नोट्स, 5) मोबाईल नियंत्रण, 6) शारीरिक व मानसिक आरोग्य, 7) सराव व पुनरावृत्ती ही यशाची सात ब्रह्मास्त्रे विद्यार्थ्यांना सांगितली.याप्रसंगी ॲड. अल्ताफ आतार यांचा शाल, पुस्तक व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर गुंड होते. याप्रसंगी प्राचार्य गुजरे, नरसाळे, लांडगे, सौ. गोरड, सौ. अस्वले, सौ. लावंड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.