शिवरत्न बंगला येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुक बाबत बैठक संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/9/2026 :
आज अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

प्रसंगी नवीन पदवीधर मतदारांची नोंदणी, त्याबाबतची प्रक्रिया, जनजागृती तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मतदारसंघातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.