सन्मान चिन्हाचा सन्मान !
“सहकार महर्षि”च योगदान !!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/9/2026 :
ऊस विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय साखर कामगार महासंघ नवी दिल्ली या संस्थेने ऊस विकासाकरिता उच्च साखर उतारा विभागातून “सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कारा”ने सन्मानित केले आहे. गौरवास्पद कामगिरी बद्दल मिळालेल्या प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्हाचा सन्मान करण्याची अभिनव कल्पना सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील कारखान्याने राबवून आपले अनोखे योगदान कृतीतून दाखवून दिले आहे. या प्रेरणादायी अभिनव कल्पकतेला “अकलूज वैभव” आणि “वृत्त एकसत्ता” चा सलाम!