अकलूज मध्ये महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 2/10/2026 :
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज मध्ये महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. गांधी चौक अकलूज येथील शेटे व्यापारी संकुल मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांचे संपर्क कार्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी गांधी चौक अकलूज येथील महात्मा गांधी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये प्रतिमा पूजनानंतर उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, पत्रकार अण्णा भोसले, पत्रकार तुषार केंगार, गोपाळ राऊत, हिरालाल मोरे, दत्तात्रय जगताप, खैरुद्दिन कोरबू, रिहान कोरबू, सागर भोसले, दत्तात्रय गायकवाड, दिलीप गिरमे, हरिभाऊ राऊत, मुन्ना शेख, सुधीर गायकवाड, वाजिद सय्यद, अजित राऊत, धनाजी अडसूळ, किरण राऊत इत्यादी उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.