कर्मवीर बाबासाहेब उर्फ मारुतराव आनंदराव माने पाटील यांची ५८ वी पुण्यतिथी साजरी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 4/10/2026 :
अकलूज
माळशिरस तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती कर्मवीर बाबासाहेब उर्फ मारुतराव आनंदराव माने पाटील यांची ५८ वी पुण्यतिथी विजय चौक अकलूज येथे साजरी करण्यात आली.
पुण्यतिथीनिमित्त अकलूज मधील विजय चौकातील कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खा.धैर्यशील मोहिते पाटील,माजी खा.रणजितसिंह मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील यांच्यासह नगरपरिषद आणि विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.