सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयात टोटल स्टेशन सर्वेक्षण विषयी तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/10/2026 :
शंकरनगर-अकलूज : येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या सिव्हिल अभियांत्रिकी (डिप्लोमा) विभागामध्ये दि. ५ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘Hands-on Practical Training on Total Station Surveying’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

या कार्यशाळेत द्वितीय वर्ष सिव्हिल अभियांत्रिकी (डिप्लोमा) विभागातील एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना आधुनिक सर्वेक्षण उपकरणांची ओळख करून देणे, प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे सर्वेक्षण कौशल्ये विकसित करणे आणि तांत्रिक ज्ञानात भर घालणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन संचिता प्रतिष्ठानचे संस्थापक सिव्हिल इंजिनीअर सचिन कुमार कुलथे यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी टोटल स्टेशन या आधुनिक सर्वेक्षण उपकरणाची रचना, कार्यपद्धती आणि विविध उपयोगांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपकरणाची सेटिंग, स्टेशन सेटअप, बॅकसाइट, कोन व अंतर मोजणी, कोऑर्डिनेट मोजणी, पॉइंट सर्वेक्षण आणि डेटा संकलन यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना टोटल स्टेशन उपकरण स्वतः हाताळण्याची तसेच प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करण्याची संधी मिळाली. आधुनिक बांधकाम प्रकल्पांमध्ये टोटल स्टेशनचे महत्त्व, अचूक मोजमापांची आवश्यकता आणि सर्वेक्षण क्षेत्रातील या तंत्रज्ञानाचे व्यावसायिक उपयोग यांचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण विषयातील सैद्धांतिक ज्ञान अधिक दृढ झाले. तसेच आधुनिक सर्वेक्षण तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्ये विकसित होण्यास आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
एकूणच, टोटल स्टेशन सर्वेक्षणावरील ही तीन दिवसीय कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, कौशल्यवर्धक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देणारी ठरली.
या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. ऋषिकेश सपकाळ यांनी काम पाहिले. विभागप्रमुख प्रा. राहुल माने देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे प्राचार्य, विभागातील प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.