शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मोरे वस्ती माळेवाडी अकलूज येथील श्री सोमेश्वर मंदिरात श्री दुर्गामाता मूर्ती स्थापना
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/10/2026 : शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त माळेवाडी अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील मोरेवस्ती – संजयनगर मधील श्री सोमेश्वर मंदिरात श्री दुर्गामाता मूर्ती ची विधिवत स्थापना करून पूजा आणि आरती घेण्यात आली.
देवस्थानचे प्रमुख आप्पा निवृत्ती मोरे महाराज यांनी मंदिरात स्वतः अत्यंत आकर्षक सजावट केलेली आहे.

रविवार दिनांक 11/10/2026 रोजी सायंकाळी श्री दुर्गामाता मूर्ती स्थापनेनंतर ची प्रथम पूजा व आरती शिवशक्ती भक्त भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या हस्ते संपन्न झाली. याप्रसंगी आप्पा निवृत्ती मोरे महाराज, प्रचारक सुनील ज्ञानेश्वर कांबळे यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते.