मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 04/02/2026 : श्रीमंती असावी असे प्रत्येकालाच वाटते. खूप कमी लोक आहेत की जे आहे त्यात समाधानी आहेत, पैसे कमावण्यासाठी धावत नाहीत आणि खूप पैसे नाहीत म्हणून नाराजही नाहीत.
खरे तर अन्न-वस्त्र-निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. म्हणजे पोटापुरते किंवा जगण्यापुरते म्हणुया जेवण हवे, लज्जा रक्षणापुरते कपडे व उन-वारा-पाऊस यापासून संरक्षणापुरता निवारा.
पण सध्या तरी इतके अल्पसंतोषी कोणीच भेटणार नाही. कितीही असले तरी “अजून” ची हाव संपत नाही. त्यापायी अथक धावपळ अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बरोबर काहीच येत नाही हे माहीत असून सुद्धा.
आजचा संकल्प
कुठे थांबावे हे लक्षात घेऊन स्वतःच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्याचा विचार करून मनाची श्रीमंती वाढवण्याचा प्रयत्न करू, स्वास्थ्य जपू.
सौ. स्नेहलता स. जगताप