‘रेड इंडियन’ आणि आपला “महाराष्ट्र”
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/02/2026 :
सूट-बूट घातलेला जो माणूस शांतपणे रडताना दिसतो, तो सहज ओळखता येतो — तो अमेरिकेचा खरा मालक आहे, मूळ रहिवासी ‘रेड इंडियन’.
आज अमेरिकेत राहणारे गोरे आणि काळे लोक आपल्या हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढताना दिसतात; पण ते त्या भूमीचे मूळ रहिवासी नव्हते. युरोप आणि इंग्लंडमधून अनेक अपराधी अमेरिकेत पाठवले गेले, आणि हळूहळू त्यांनी संपूर्ण भूमीवर ताबा मिळवला.
हे अपराधी आणि नंतर त्यांच्यासोबत आणले गेलेले आफ्रिकन गुलाम — यांनी मिळून अमेरिकेवर सत्ता प्रस्थापित केली. रेड इंडियन लोक सहिष्णु आणि उदार होते. त्यांना वाटले, “इतकी मोठी जमीन आहे, इतकी समृद्धी आहे — काही लोक आले तर काय बिघडते?”
पण लोक येतच राहिले. जमीन काबीज केली गेली. विरोध करणाऱ्यांना शोधून मारण्यात आले. आणि अखेरीस, करारांच्या नावाखाली त्यांना स्वतःचीच जमीन सोडावी लागली.
आजही ते दृश्य पाहायला मिळते — भरलेल्या सभागृहात एक मूळ रहिवासी आपल्या भूमीसाठी आणि आपल्या लोकांसाठी अश्रू ढाळत आहे; आणि इतर लोक थंडपणे आपापल्या कामात मग्न आहेत. हीच अमेरिकेची कथा — जिथे मूळ रहिवासी आपल्या भूमीतून विस्थापित झाले, आणि त्यांच्या जागी युरोपियन व त्यांच्या आणलेल्या आफ्रिकन गुलामांच्या पिढ्या स्थायिक झाल्या.
रेड इंडियन लोकांची संस्कृती, त्यांची स्वप्ने, त्यांचे स्वातंत्र्य — हळूहळू लोप पावले. राजकारण क्रूर ठरले, अर्थकारण निर्दयी ठरले, आणि समाजव्यवस्थाही कठोर ठरली. आपण डोळे मिटले तरी इतिहासाचे सत्य बदलत नाही — इतिहासाने त्यांना खोल जखमा दिल्या आहेत.
एक दिवस हेच दृश्य भविष्यातील पिढ्यांसमोर इतिहास म्हणून उभे राहील. तेव्हा लोक समजून घेतील — खरे मालक कोण होते, आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून कसे दूर केले गेले.
हीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे.. भूमिपुत्रांचे हक्क
डावलले जात आहेत. मोक्याच्या जागेवर परप्रांतीय हक्क सांगत आहेत. रोजगार बळकावला जात आहे.
पोटपाण्यासाठी आलेले हे लोक आज राज्यकर्ते बनू पाहत आहेत.
एक एक मोठी शहरं, जिल्हा, तालुका अगदी गावागावा पर्यंत यांचे आज अस्तित्व जाणवतं आहे.
म्हणून सावध व्हा! आपला भूमी, आपली भाषा, आपली संस्कृती जतन करा.
हेच तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं परकीय लोकांना आपल्या भूमीत पाय रोवू दिला नाही.
वाचा, समजा आणि स्वतःचे मत बनवा — हा कोणावरही हल्ला नसून इतिहासाचा वेध आहे.
सडेतोड_बेनाडीकर AmericanHistory