मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/02/2026 :
दैनंदिन जीवनात आपला अनेक लोकांशी संपर्क येतो. काही घरातले असतात, काही नात्यातले. काही परिचित काही अपरिचित. अपरिचित लोकांशी संभाषण करण्याचा प्रसंग क्वचित येतो पण परिचित लोकांशी आपण वेळेनुरूप गप्पा मारत असतो.
यातले बरेचजण आपले हितचिंतक असतात. ते आपल्या भल्याचे, हिताचेच बोलत असतात. आपल्या बरेच काही शिकवतात, अनुभव देतात. काहीजण आपल्या परीक्षा घेत असतात.
आपण कसे वागावे व कसे वागायला नको होते हे आपल्याला मनापासून शिकवणारे व आपली परीक्षा पाहणारे जेव्हा भेटतात तेव्हा ते आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करत असतात.
आजचा संकल्प
मनापासून आपले हित जपणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे व आपलेच असणाऱ्या व्यक्तींना ओळखून त्यांच्या संगतीचा फायदा घेऊ व आपले व्यक्तिमत्व घडवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.