विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/02/2026 :
अनेकदा आपण रुबाबात सांगत असतो, ‘मी कोणाला घाबरत नाही!’ आपल्याला ते सांगताना भारी वाटते. पण आपण स्वतःलाच घाबरले पाहिजे. आपलाच आपल्याला धाक वाटला पाहिजे.
आपण लहान असताना घरातले सांगायचे देव बाप्पा पाहतोय सगळे, कान कापेल वगैरे. आपल्याला पण त्यावेळेस खरे वाटायचे. हेतू हा की त्या भीतीने का होईना चुकीचे काही करू नये.
मुलांनो, देव पाहतोय का नाही पहात हे बाजूला ठेवू. पण जसे कर्म तसे फळ मिळतेच हे मात्र लक्षात घेऊ. दुसऱ्याला आनंद दिलात तर आनंद मिळेल, दुःख दिलेत तर तुम्हाला पण ते मिळणारच.
प्रामाणिकपणे सत्कर्म करत राहू, अपेक्षा केली नाही तरी चांगले फळ मिळेलच.
सौ. स्नेहलता स. जगताप.