विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/03/2026 :
आपल्याला या वयात श्रीमंतीचे फार आकर्षण असते. त्यांचे पोशाख, त्यांच्या गाड्या, त्यांची ऐश आपल्याला मोहात पडते. श्रीमंत माणसे पाहिली की मोठेपणी आपण पण असेच व्हायचे अशी स्वप्ने आपण पाहतो.
मोठे झाल्यावर समजते खरी श्रीमंती वेगळीच असते. आपल्याला रात्री शांत झोप लागते, गजर न लावता सकाळी जाग येते. घरातील सर्वजण आपण शिळोप्याच्या
गप्पा मारतो, एकत्र बसून जेवतो.
मुलांनो, आपल्याला कोणत्याच गोळ्या औषधे नाहीत, आपण छान जिने चढू शकतो, धावू-पळू शकतो. आपले सर्व नातलगांचे एकमेकांच्याकडे जाणे-येणे चालू आहे ही खरी श्रीमंती, ही कमवा.
श्रीमंती नेहमीच पैशात नसते. माणसांची श्रीमंती हीच खरी श्रीमंती.
सौ. स्नेहलता स. जगताप