सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची “बजाज ऑटो लिमिटेड” पुणे येथे निवड
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/03/2026 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या “बजाज ऑटो लिमिटेड” पुणे या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील डिप्लोमा मेकॅनिकाल विभागातील अंतिम वर्षामध्ये शिकत असणाऱ्या कु. श्रद्धा सावंत, कु. तन्वी रेडे, कु. दिपाली जाधव, चि. शाहीद मुलाणी, चि. ज्ञानेश्वर झिंजुर्डे, चि. प्रशांत मोरे व चि. उदय चव्हाण

तसेच इलेक्ट्रीकल डिप्लोमा विभागातील कु. कोमल रागडे, कु. समृद्धी कुलकर्णी, कु.दिक्षा लोंढे, कु. सुप्रिया भिंगारदिवे, चि. आदित्य सालगुडे-पाटील व नवाब शेख या विद्यार्थ्यांची “बजाज ऑटो लिमिटेड” पुणे या नामांकित कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले
मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.स्वप्निल निकम, इलेक्ट्रीकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.सागर कांबळे तसेच प्रा. धनवले एस.पी., प्रा.फुले पी. जी. आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. संगीतराव पी. वाय. यांनी काम पाहिले.