मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 06/03/2026 :
जीवनात दररोज अनेक माणसे भेटतात. काही जवळची, परिचित असतात तर काही अपरिचित. अनेकदा अपरिचित लोकांपेक्षा परिचित लोकांच्या पासून सावध रहावे लागते.
आपलेच लोक आपल्याला मागे ओढण्यासाठी उत्सुक असतात. कोणाची कशी खेचायची हे त्यांना चांगले माहित असते. एखादा पुढे जावा म्हणून त्याला हात देण्याऐवजी पाय ओढून मागे खेचणारे अनेक असतात.
आपण प्रत्येकाने इतरांशी वागताना त्यांना मदत होईल असे वागणे अपेक्षित असते. मदत नाही करता आली तरी आपल्यामुळे कोणी अडचणी तर येणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
आजचा संकल्प
परिचित असो वा अपरिचित, एखाद्याला पुढे जाण्यासाठी आपल्याकडून मदत नाही करता आली ठीक पण आडकाठी तरी न आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू व एक बांधव म्हणून नाते टिकवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.