विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/03/2026 :
उन्हाळा सुरू झाला. तापमानातील बदल जाणवू लागला आहे. त्यामुळे शाळेत जाताना किंवा घरी येताना ऊन असेल तर काळजी घ्या.
डोक्यावर टोपी किंवा छत्री, डब्यासोबत पाण्याची बाटली, शक्य असेल तर गॉगल (स्टाईल म्हणून नाही पण गरज म्हणून) आवश्य सोबत ठेवा. बाहेरचे कुठलेही पाणी पिण्याचे टाळा. उघड्यावरील चिरलेली फळे, सरबते यांच्या मोहात पडू नका.
मुलांनो, लवकरच वार्षिक परीक्षा सुरू होतील. दूषित अन्न व पाणी यामुळे टायफाईड, कावीळ, उलट्या-जुलाब यासारखे आजार होण्याची शक्यता असते. जोडीला गोवर, कांजिण्या व डोळे येणे हे पण संसर्गजन्य आजार या दिवसात डोके वर काढतात.
योग्य ती काळजी घ्या, आरोग्य जपा.
सौ. स्नेहलता स. जगताप.