विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/03/2026 :
काल नवीन हिंदू वर्षाची सुरुवात झाली. या वर्षी आपण थोडा वेगळा अभ्यास करू. म्हणजे मराठी महिने व त्यामधील तिथी, पक्ष असे लक्षात घेऊ.
प्रत्येक महिना तीस दिवसांचा. शुद्ध प्रतिपदा म्हणजे महिन्याचा पहिला दिवस, पुढील प्रत्येक तिथी समजून घ्या. पंधराव्या दिवशी पौर्णिमा, मग दुसरा पंधरवडा, कृष्ण पक्ष. प्रतिपदा ते चतुर्दशी तशाच तिथी, आणि तिसाव्या दिवशी अमावस्या.
अमावस्या झाली की नवीन महिना सुरु. कधी कधी तिथीचा क्षय होतो तर कधी एक तिथ थोडी थोडी दोन दिवस असते. इंग्रजी महिने व मराठी महिने मागे पुढे असतात. कॅलेंडरवर तारीख-वार पाहताना मराठी महिना व तिथी पाहण्याची सवय लावा.
मराठी नवीन वर्षात तिथी समजून घेण्याचा संकल्प करू.
सौ. स्नेहलता स. जगताप