मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/03/2026 :
जीवनात प्रत्येक टप्प्यात संघर्ष असतोच. अगदी पहिले पाऊल टाकताना लहानपणी व लटपटणाऱ्या पायांनी तोल सावरताना वृद्धापकाळातही संघर्ष करावाच लागतो.
वैयक्तिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील संघर्ष, त्याची कमी-अधिक तीव्रता आपल्याला लढा द्यायला शिकवते. ती आपली एक प्रकारची परीक्षाच असते. कोणतीही कारणे न देता लढा देणे कधीही योग्य.
या काळात माघार न घेता किंवा खचून न जाता हिम्मत धरणे महत्वाचे असते. स्वाभिमान टिकवून ठेवणे व आत्मबलाच्या जोरावर आलेल्या समस्येवर मात करणे आपल्या हातात असते.
आजचा संकल्प
जीवनातील चढ-उतार म्हणजे येणाऱ्या समस्या. त्यावर मात करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. न हरता त्यावर मात करू व समस्या सोडवू.
सौ. स्नेहलता स. जगताप