महाराष्ट्र महिला राज्य आयोग
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
अकलूज दिनांक 22/03/2026 :
हा महिला आयोग स्थापन होणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे 25जानेवारी1993रोजी आयोगाची स्थापना झालेली. महिला आयोगाची स्थापना करण्यापाठीमागचा उद्देश महिला हक्काचं संरक्षण आणि मुलभुत अधिकारांचे रक्षण करत सक्षमीकरण करणे हा आहे महिला अधिकारांचे हनन होत असल्यास ते थांबवत सरकारला महिलांच्या विकासाच्या शिफारशी करणे धोरणा योजना व कायदे सुधारणांबाबत सरकारला सूचना देणे,कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे पहाणे, जनजागृती करणे,महिलांचे हक्क,कायदे व संरक्षण याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीवर संशोधन अभ्यास करून अहवाल तयार करणे,पिडीत महिलांना समुपदेशन,मार्गदर्शन व आवश्यक असलेली मदत पुरवणे महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम,शिक्षण,रोजगारासाठी विविध योजना राबवणे
मर्यादा
महिला आयोगाला शिक्षा करण्याचा अधिकार नाही अर्थात न्यायालयीन अधिकार नाहीत कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा पोलीस आहे निर्णय देणारी यंत्रणा ही न्यायालय आहे आणि निर्णय घेणारी यंत्रणा म्हणजे सरकार यामुळे महिला आयोग फक्त शिफारशी देऊ शकतो.
राजकीयहस्तक्षेप
महिला आयोग हा नेहमीच राजकीय हस्तक्षेपामुळे प्रभावित राहिला आहे महिला आयोग अध्यक्ष नेहमीच राजकीय पक्षात सक्रीय राहीलेल्या कार्यकर्त्या सदस्या राहिलेल्या आहेत यात रुपाली चाकणकर या प्रत्यक्ष राष्ट्रवादीच्या सक्रीय कार्यकर्ता असताना अध्यक्ष पदावर निवडल्या गेल्या आयोगावर काम करताना त्यांनी पक्षाचा प्रचार प्रसार करण्यावर जास्त भर दिला.पिडीत महिलांच्या बाजुचे उभे रहाण्याऐवजी पिडीत महिलांच्या विरोधात त्यांनी काम केलं.पुण्याचं वैष्णवी हगवणे प्रकरण यात वैष्णवी ची नणंद नवरा यांच्या विरोधात लेखी तक्रार असतानाही आरोपी नंणद जी पार्लर आणि बुटीक चालवत होती तिच्या बाजुने उभ्या राहिल्या(बुटीक पार्लरच्या गिर्हाईक)बीडची सातार्यातील डाॅ.संपदा मूंडे यांच्या म्रत्यु बाबत प्रेस काॅन्फर्न्स घेत संबंधीत डाॅक्टरचे चारित्र्यहनन (तपास सुरू )असताना रुपाली ताईंनी केले रुपाली ताई चाकणकर यांच्यासोबत आयोगाच्या इतर सदस्य महिला कधीच दिसल्या नाहीत तशी माहीतीही प्रसिद्धी नाही थोडक्यात one women show त्यांचा होता
मध्यंतरी मी सामाजिक कार्यकर्ती असल्याने गेल्या दोन वर्षांत रुपाली ताई चाकणकर यांची एकदा पुण्यात भेट घेतली तेव्हा त्यांना नखशिखांत न्याहळण्याची संधी मला मिळाली त्यावेळी त्यांच्या नखांना लावलेलं नेलपाॅलिश ग्रे शेडचं.प्रचंड किमती असावं विशेष म्हणजे नखांना कोरलेलं होतं (मेरीपेडीक्युअर)असं काहीसं यावरून स्वयंपाकघरातील चिरण्याची,भांडे घासण्याची फरशी पुसण्याचे कष्टाचे आणि विळी,सुरी,चाकु बोटाला लागेल अशी कामे त्या शंभर टक्के करतच नाहीत यामुळे सुषमा ताई अंधारे यांनी केलेलल्या अनामिका दाव्यात सत्य असण्यास वाव आहे.अर्थात त्या उच्चभ्रू उच्चवर्णीय,राजकीय वारसा श्रीमंत घरातुन येत असल्याने त्यांच्यावर घरकाम न करण्यात जास्त जबाबदारी नसावी.
त्यावेळी रुपाली ताई चाकणकर त्यांना म्हणजेच महिला आयोगाला सोशल मिडीयावर सायबर क्राईम करणार्या एका टोळीबाबत भेटुन कागदपत्रे अर्ज दाखवली वेळोवेळी डझनभर मेल पाठवले पण आयोगाकडुन पोलीस अधीक्षकांना आयोगाचे फक्त पत्र आले कारवाई तपास मात्र शुन्य आणि आरोपी मोकाट असं झालं.
खरात प्रकरणात मात्र चाकणकर यांनी #सुमोटो म्हणत ज्या दत्तात्रय पत्रकाराने हे प्रकरण वर्तमानपत्रात छापुन आणलं कॅप्टन नावाने त्याला ते बंद करायला लावणं,खुलासा छापायला लावणं एक प्रकारची धमकी देण हे जास्त भयंकर आहे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या आणि संवैधानिक पदावर असलेल्या महिलेने हे करणं म्हणजे ही चुक नसुन तो गुन्हा आहे आणि याचमुळे रुपाली ताई यांना पद गमवावे लागले.आरोपी करणं अपेक्षित आहे
बाकी,गंडेदोरे बांधणं,पाय धूणे हे धार्मीक आचरण म्हणुन निपटवता आलं असतं पण अनामिका प्रकरण खरातच्या संस्थेवर सदस्य असणं आणि याचमुळे जन आक्रोशाला त्यांना सामोरं जावं लागलं.
महत्वाचं म्हणजे राज्य महिला आयोगाकडे जास्तीत जास्त प्रकरणं उच्चवर्णीय,मध्यमवर्गीय महिलांची जातात सामान्य महिला क्वचितच महिला आयोगाकडे जात असाव्यात कारण मी धायरीत पक्ष कार्यालयात लाईन लागलेली बघीतली मुंबई सरकारी कार्यालयात ही असं दिसुन येतं शहरातीलग्रामीणभागातीलगरीबउच्चभ्रूमहिंलांतीलअंधश्रद्धा
ग्रास रुट वरकाम करताना ग्रामीण भागातआम्हाला काही अंधश्रद्धेचे बाबत दिसतं जसं गरीब निरक्षर अडाणी क्वचित शिकलेल्या ही या महिला उपासना धरणं अंगात आणणं,जोगवा मागणं पोत खेळणे वेगवेगळ्या मंदीरात श्रद्धेपोटी जाणं ह्या त्या करतात जाणत्याकडुन गंडेदोरेही बांधतात पण हे असले भोंदुबाबा उच्चशिक्षित उच्च दर्जाचे हरामखोर लाखो रूपयात फी घेणारे यांच्याकडे त्या सहसा जात नाहीत.अशा बाबाकडे जाणाऱ्या जास्तीत जास्त महिला या उच्चशिक्षित शिकले सवरलेल्या अधिकारी वर्गातुन जास्त येतात यावर रुपाली ताई चाकणकर यांच्या महिला आयोगाने काम करणं गरजेचं होतं, जे त्यांनी केलं नाही
योनीशुचिता
महाराष्ट्र सह देशात महिलांचा दुय्यम स्थान त्यांच्यावर होणारे हिंसाचार याला जबाबदार पित्रुसत्ता आणि त्यातील योनिशुचिता आहे ज्यामध्ये स्त्रियांची योनी पवित्र पतीव्रत्ता असावी याकडे जास्त कल इथल्या बहुतांश पुरूषांचा असतो,असे असताना 100च्या वर स्त्रियांजवळ झोपणारा हा खरात बाबा महिलांच्या योन्या झोपुन शुद्ध करतो,नेमकं काय करतो?या महिला त्याच्याकडे का गेल्या?कुणी पाठवल्या?स्वताहुन गेल्या?की नवर्यांनी राजकीय लालसेपोटी नेत्यांकडे पाठवल्या?आजारपण होतं,की, त्या महिलांची लैंगिक इच्छा पुर्ण होत नव्हती की,प्रतिष्ठित फेमस पुरूषांजवळ संबंध ठेवण्याची संधी होती म्हणुन गेल्या हा संशोधनाचा भाग आहे यावर रूपाली ताईंना काम करता आलं असतं असं असताना त्यांनी सदरील प्रकरण दाबलं म्हणजेच रुपाली ताईंना माहीत होतं.
महिला आयोगाच्या या कार्यपद्धतीला राज्यातलं तिघाडं सरकार ही तेवढंच जबाबदार आहे,कारण या खरात बाबाच्या आसलुंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,श्रीकांत शिंदे,सुनिल तटकरे जयंत पाटील मिलिंद नार्वेकर आणि बरेच मुरब्बी नेते होते एवढंच नाही तर या खरात बाबाकडून ओश्नो जर यात वायग्राच्या गोळ्या,त्याचं स्वतःचं मुत्र विर्य टाकून तो पुरूषांना इरेक्टाइल डिस्फंक्शन बाबत देत होता म्हणजेच वैद्यकीय गोळ्यांचा (विज्ञानाचा) आधार घेऊन अंधश्रद्धा पसरवत होता.
पुरोगामी शिव फुले सावित्री शाहु आंबेडकरांंच्या महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडतयं की,महिला आयोगाच्या अध्यक्ष महिलेला महिलांच्या लैंगिक शोषणामुळे पदाचा राजिनामा देण्याची वेळ आली
बाकी शिकल्या सवरेल्या नोकरदार अधिकारी बायकांनी ज्या संवैधानिक मुल्यांचा अभ्यास केला असता तर पण या बहुतांश महिला वर्गाला संविधानाचा प्रचंड तिटकारा आहे.याचीच फळं ह्या भोगत्यात असो तुर्तास एवढंच आणखी बरंच काही समोर येणार आहे
सत्यभामा सौंदरमल
सचिव,निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था
माजलगाव बीड