✍️ HAPPY THOUGHTS
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 20/03/2026 :
पूर्वी गावागावांत अशी जीवापाड निखळ दोस्ती जपणारी ‘साधी माणसं’ सायकलवर फिरताना दिसायची. एकमेकांची पराकोटीची थट्टा करायची, पण एक दुस-याला जीवापाड जपायची. एक दमला तर दुसरा सायकल चालवायचा. अशा अनेक जोड्या असायच्या, त्यांचं एकमेकांशिवाय व्हायचं नाही. एका ताटात जेवायची, एकच चहा अर्धा अर्धा प्यायची. मैत्री अशीच असावी आनंद देणारी, सुखदु:खात साथ देणारी, प्रगतीकडे नेणारी, उत्साह वाढवणारी मग जगणं सार्थक होतं. काळ बदलला, सायकल जाऊन मोटार सायकल, कार आली. पण बाकी सर्व हरवलं. वेगामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी झालं पण मैत्री, मैत्रीतलं अंतर मात्र वाढलं.
✍️ प्रा. एस. एम. पाटील
देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)
✒️ संकलन : प्रविण सरवदे, कराड,