विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/04/2026 :
सध्या जागतिक वातावरण बिघडले आहे. राजकारण, धर्मकारण यामधून परस्परांमध्ये तेढ वाढत आहे. आपण आपल्या हिंदू संस्कृतीचा सन्मान ठेवून परस्पर संबंध ठेवू.
आपल्या साधू-संतांची शिकवण अंगिकारू. त्यांच्या उपदेशाचे पालन करू. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस ही जात व मानवता हा धर्म पाळू.
सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून परस्परांशी वागू. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक लक्षात घेऊ. माउलींच्या ओव्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊ; तुकाराम महाराजांचे परखड विचार अभ्यासू.
मुलांनो, संत-महंत व भोंदू यातील फरक समजून घ्या अन् कोणाचे अनुकरण करायचे ते ठरवा.
सौ. स्नेहलता स. जगताप