मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 02/04/2026 :
दिवसातून एकदा तरी आपण “कंटाळा आला” असे म्हणतो. त्याच्याकडे आपण नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. कंटाळा येणे वाईट, चालू कामात अडसर असे आपल्याला वाटते.
पण त्याकडे थोडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर दिवसातून एक-दोन वेळा तरी कंटाळा आला पाहिजे असे वाटेल. कंटाळा येतो म्हणजे नेमके काय तर तेच तेच काम करून मेंदू शिणतो व ते काम बास असे वाटते.
याचा अर्थ काहीतरी बदल हवा. अशा वेळेस आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट केली किंवा थोडा आराम केला की कंटाळा जातो, कामात बदल होतो. थोड्या वेळाने पुन्हा उत्साही वाटते व पहिले काम करण्यासाठी मनाची तयारी होते.
आजचा संकल्प
कंटाळा आला याचा बाऊ न करता त्याचे चांगल्या दृष्टिकोनातून स्वागत करू व आपल्या दैनंदिन जीवनात आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उपयोग करून घेऊ._
सौ. स्नेहलता स. जगताप