मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/04/2026 : जीवनात वेगवेगळ्या स्वभावाचे अनेक लोक भेटतात. प्रसंगानुरूप आपले त्यांच्याशी संभाषण होते; कधी आपुलकीचे, कधी वरवरचे, तर कधी मैत्रीचे. इतरांशी बोलताना आपण शक्यतो गोड बोलतो.
आपल्या स्वभावातील गोडवा इतरांना खूश करेल; पण त्यातून तुम्हाला समाधान मिळत असेल तरच तो गोडवा योग्य आहे. अन्यथा, त्यामुळे जर तुम्हाला बाकीचे चुकीचे समजत असतील किंवा ते त्रासदायक होत असेल, तर तो गोडवा काय कामाचा?
आपल्याला वेळेनुरूप कणखर होता आले पाहिजे, स्पष्ट नकार देता आला पाहिजे. समोरचा ज्या पद्धतीने बोलेल, त्या पद्धतीने उत्तर देता आले पाहिजे. गोड बोलूनही ज्याची त्याची जागा दाखवून देता येते.
आजचा संकल्प
कुणाच्याही दबावाखाली न राहता त्या परिस्थितीला योग्य असे उत्तर देऊ. कोणाचे शब्द मनाला लावून न घेता, त्यांचे कर्म त्यांच्यावर सोडून देऊ व चिंतामुक्त जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप