विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/04/2026 :
आपल्याला लहानपणापासून आई-वडील ‘संगत चांगली ठेवा’ असे सांगत असतात. आपले मित्र कोण आहेत, आपण कोणाबरोबर असतो, याकडे त्यांचे लक्ष असते.
शाळेतही शिक्षकांचे लक्ष असते. उरलेसुरले नातलग व शेजारीपण लक्ष ठेवून असतात. जरा कुठे मार्क्स कमी पडले किंवा इतर काही त्यांना नको असलेले बदल जाणवले की, मित्र-मैत्रिणी कोण आहेत याचा शोध सुरू होतो.
मुलांनो, दुसऱ्याला दोष देणे पूर्णतः चुकीचे आहे. ज्याला बिघडायचे असते, त्याला कोणाची गरज लागत नाही आणि ज्याला घडायचे असते, त्याला मित्र बिघडवू शकत नाहीत. घडणे-बिघडणे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.
गुलाब काट्यांमध्ये फुलतो व कमळ चिखलात उमलते.
सौ. स्नेहलता स. जगताप