गायकवाड 卐 सोंडे मंगल परिणय सोहळा थाटाने संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/05/2026 :
बु. द्रोपदी व बु. विठ्ठल बाबू गायकवाड यांची नात व सौ प्रतिभा विलासनंद गायकवाड (नगरसेविका व सभापती, महिला व बाल विकास समिती, नगरपरिषद अकलूज) व आयु. विलासनंद विठ्ठल गायकवाड ( कार्यकारी संपादक, पाक्षिक वृत्त एकसत्ता) रा. अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची जेष्ठ कन्या उपासिका वैष्णवी आणि उपासक शुभम ( बु. हिराबाई व बु. संपत नामदेव सोंडे यांचे नातू व सौ नमिता व आयु. संपत सोडे, राहणार नागेवाडी, तालुका खानापूर जिल्हा सांगली यांचे ज्येष्ठ चिरंजीव) यांचा मंगल परिणय सोहळा रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी दुपारी 12 : 35 वा. संपन्न झाला. कृष्णप्रिया मल्टी फंक्शन हॉल, बायपास रोड, संग्रामनगर – अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणी अत्यंत थाटाने पार पडलेल्या मंगल परिणय सोहळ्या प्रसंगी उभय पक्षाकडील विविध क्षेत्रातील, विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधू वरास शुभाशीर्वाद दिले.
या परिणय सोहळ्याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान गायकवाड व सोंडे परिवाराच्या वतीने करण्यात आला.