“तिथे फोटो लगेच दिसतो. करार दिसत नाही”
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/05/2026 :
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर गेले आणि नेहमीसारखाच एक ठराविक वर्ग समाज माध्यमांवर पुन्हा सक्रिय झाला. “पुन्हा फिरायला गेले”, “फोटो काढायला गेले”, “देशात प्रश्न आहेत आणि हे बाहेर फिरतायत” अशा कमेंट्स सुरू झाल्या. काहींनी तर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींसोबतच्या त्यांच्या फोटोवर इतक्या खालच्या दर्जाच्या प्रतिक्रिया दिल्या की ते पाहून लाज वाटावी! ह्या सोशल मीडियाचं एक वैशिष्ट्य आहे. तिथे फोटो लगेच दिसतो. करार दिसत नाही. meme लगेच viral होतं. पण मोदींच्या त्या एका सहीमुळे पुढच्या दहा वर्षांत देशात किती रोजगार तयार होणार आहेत, किती उद्योग उभे राहणार आहेत, भारत किती मजबूत होणार आहे… हे दिसत नाही! मोदींचा हा पाच देशांचा दौरा तसाच होता.
१५ मे ते २० मे २०२६ दरम्यान मोदींनी संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट दिली. त्यांना ट्रोल करणाऱ्या अनेकांना जगाच्या नकाशावर हे देश कुठे आहेत इतपत भूगोल देखील येत नसेल. पण शिव्या छान देता येतात! तर मोदींच्या या दौऱ्यात संरक्षण, सेमिकंडक्टर, ऊर्जा, ग्रीन टेक्नॉलॉजी, लॉजिस्टिक्स, हेल्थकेअर आणि critical minerals या क्षेत्रांमध्ये जवळपास ४० अब्ज डॉलर म्हणजे साधारण ३.३ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आणि सहकार्याची दिशा तयार झाली.
आपण सर्वांनी सगळ्यात आधी समजून घ्यायला हवं की आजचं जग झपाट्याने बदललंय. पूर्वी देश फक्त युद्धांनी शक्तिशाली होत होते. आज देश technology, semiconductor, AI, energy security आणि supply chain मुळे शक्तिशाली होतात. ज्याच्याकडे chip manufacturing आहे, ज्याच्याकडे energy access आहे, ज्याच्याकडे logistics आणि data control आहे, तो देश पुढची २० वर्षं जगावर प्रभाव टाकणार आणि म्हणूनच या दौऱ्यातला सर्वात महत्त्वाचा भाग होता ” सेमिकंडक्टर.” कारण आजच्या जगात chip म्हणजे नवं oil आहे. चीप शिवाय जगाची आता कल्पनाच करता येणार नाही. कारण मोबाईल, कार, fighter jet, missile system, AI server, medical machine पासून अगदी विरोधकांच्या घरातही आढळणारे TV, washing machine पर्यंत सगळीकडे chip लागते. कोविडच्या काळात जगाला समजलं की semiconductor supply थांबला तर संपूर्ण उद्योग थांबतात. कारण त्या काळात ह्याच कारणाने कार कंपन्यांची उत्पादनं थांबली होती. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या अडकल्या होत्या. म्हणून आता प्रत्येक मोठा देश स्वतःचं chip ecosystem उभं करण्याचा प्रयत्न करतोय.
आणि इथेच मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याचं महत्त्व प्रचंड वाढतं.
नेदरलँड्समध्ये मोदी आणि तेथील पंतप्रधान रॉब जेटन यांच्या उपस्थितीत Tata Electronics आणि डच कंपनी ASML यांच्यात ऐतिहासिक करार झाला. आता ASML म्हणजे काय? तर ASML ही जगातली सर्वात महत्त्वाच्या technology कंपन्यांपैकी एक आहे. जगात advanced chip manufacturing साठी लागणारी जवळपास सगळी lithography machines एकटी ASML बनवते असं म्हणाल्यास वावगं ठरणार नाही. ती इतकी महत्त्वाची technology आहे की अमेरिका आणि युरोप अनेक देशांना ती सहज देत नाहीत. चीनलासुद्धा त्या बाबत अनेक मर्यादा आहेत. आणि आता मोदींच्या दौऱ्यानंतर ती technology भारतात येते आहे. Tata Electronics गुजरातमधल्या धोलेरामध्ये भारताचा पहिला commercial front-end semiconductor fab उभारत आहे. या प्रकल्पाची किंमत तब्बल ११ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास ९० ते ९५ हजार कोटी रुपये आहे! हा साधा कारखाना नाही. हा भारताच्या औद्योगिक इतिहासातला turning point असू शकतो. या plant मध्ये दर महिन्याला ५० हजार wafers process करण्याची क्षमता असेल. Automotive, mobile, AI, communications यासाठी लागणारे semiconductor chips इथे तयार होणार आहेत.
लगेच काही लोक विचारातील ‘याचा मला फायदा काय?” त्याचं थेट आणि सिंपल उत्तर अस की आज भारत मोठ्या प्रमाणावर chips आयात करतो. उद्या भारत स्वतः chips बनवू लागला तर electronics उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढेल. Apple, Samsung अशा मोबाईल कंपन्या, जगातील automotive कंपन्या, AI hardware कंपन्या भारताकडे वेगळ्या नजरेने पाहतील. Tata Electronics आधीच भारतात Apple ecosystem मध्ये मोठा प्लेअर बनते आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने Wistron आणि Pegatron च्या operations ताब्यात घेतल्या. आज Tata Electronics कडे सुमारे ७५ हजार कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची FY25 मधील उलाढाल सुमारे ६६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे!
याचा अर्थ असा की भारत आता फक्त “स्वस्त मजूर” पुरवणारा देश राहिलेला नाही. भारत आता high-end electronics manufacturing मध्ये शिरतो आहे. आणि ही फक्त Tata ची गोष्ट नाही. Foxconn, HCL, Micron, AMD, Applied Materials अशा अनेक कंपन्या भारतात semiconductor ecosystem उभी करत आहेत. HCL-Foxconn चा उत्तर प्रदेशातला जवळपास ३,७०६ कोटी रुपयांचा semiconductor project आधीच मंजूर झाला आहे. म्हणजेच पुढच्या ५ ते १० वर्षांत भारतात हजारो नाही तर लाखो high-skill jobs तयार होऊ शकतात. Engineers, technicians, clean-room operators, AI specialists, logistics, chemical supply chain, machine maintenance — पूर्ण ecosystem तयार होते आहे. आज देशभरात अभ्यास करून शिक्षण घेऊन आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. पण आयुष्यातील महत्वाची वर्ष कुठल्यातरी नेत्याच्या उथळ विचारांनी भारावून जाऊन सरकार विरुद्ध गरळ ओकणाऱ्या मुलांना मात्र ह्या संधी मिळणार नाहीत. पूर्वी आपल्या अभ्यासू, हुशार मुलांना chip industry मध्ये काम करायचं असेल तर Taiwan, South Korea किंवा America गाठावं लागायचं. उद्या ती संधी भारतात तयार होऊ शकते.
मोदींच्या दौऱ्यात UAE सोबत energy security वरही महत्त्वाच्या चर्चा झाल्या. भारतासाठी stable oil supply हा अजूनही मोठा मुद्दा आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा आणि पुरवठ्याचा परिणाम एकूणच महागाई वाढण्यात होतो. त्यामुळे मध्यपूर्वेशी मजबूत संबंध ही फक्त diplomacy नसून kitchen economics आहे. स्वीडन आणि नॉर्वे बरोबर green energy, maritime technology, climate innovation आणि clean mobility वर मोदींची चर्चा झाली. आज जग green transition कडे जातंय. भविष्यात electric mobility, hydrogen fuel, green shipping यात जो पुढे असेल तो आर्थिकदृष्ट्या मजबूत राहणार!
आणि मग आला बहुचर्चित इटली दौरा. सोशल मीडियावर लोक “मेलोडी”चे memes करत होते. मोदी आणि जॉर्जिया मेलोनींच्या फोटोंवर jokes करत होते. पण त्याच वेळी भारत आणि इटली हे दोन देश defence, critical minerals, technology, ports, healthcare आणि trade बाबत मोठे करार करत होते. भारत आणि इटलीने आपले संबंध “Special Strategic Partnership” पर्यंत वाढवले. ह्यातील critical minerals वरचा भाग विशेष महत्त्वाचा आहे. कारण भविष्यात lithium, cobalt, rare earth minerals हेच नवं तेल, ऊर्जा असणार आहेत. EV battery पासून missile systems पर्यंत सगळीकडे हे नवीन ऑईल लागणार आहे.
आज जगातला खरा संघर्ष फक्त जमिनीवर नाही. technology supply chain वर आहे. आणि भारत आता मोदींच्या दूरदृष्टीमुळे त्या खेळात गंभीरपणे उतरतो आहे.
आता तेच नेहमीचे टीकाकार विचारातील की “(देश वगैरे जाऊ दे) ह्या सगळ्याचा मला काय फायदा?” त्याचं उत्तर अगदी साधं आहे. जर semiconductor industry भारतात उभी राहिली तर भारतात लाखो नोकऱ्या तयार होतील, electronics export वाढेल, डॉलर भारतात येतील, रुपया मजबूत राहायला मदत होईल, high-paying manufacturing jobs तयार होतील, भारताचे चीनवरील अवलंबित्व कमी होईल, देशाचा defence sector मजबूत होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताला जग गंभीरपणे घ्यायला लागेल. कारण आज जगात ज्यांच्याकडे technology आहे, त्यांच्याकडे ताकद आहे. म्हणून मोदी मेलोनींसोबत हसताना दिसले, फोटो viral झाले, memes तयार झाले त्या फोटोच्या मागे भारताचं सेमीकंडक्टर मधील भविष्य उभं रहात होतं. Tata Electronics चा ९० हजार कोटींचा fab उभा होत होता. ASML सारखी जगातली सर्वात महत्त्वाची tech company भारतात technology आणायला तयार होत होती. त्याच भारतात जिथे सोशल मीडियावर आपल्याच पंतप्रधानांची थट्टा करणारे लोकही राहतात.
उद्या त्यांच्या मुलाला, मुलीला किंवा त्यांना स्वतःला semiconductor company मध्ये नोकरी मिळाली, त्यांच्या शहरात electronics plant उभा राहिला, भारतात बनलेल्या chips जगभर जाऊ लागल्या… तर त्यामुळे देशाला आणि त्याहूनही महत्वाच्या मोदींच्या टीकाकारांना होणाऱ्या फायद्यात मोदींच्या ह्या दौऱ्याचा आणि त्या ट्रोल केलेल्या “त्या फोटो”चा छोटासा का होईना, पण वाटा असणार आहे.
टीप – पोस्ट पटल्यास, आवडल्यास “शेयर बटण दाबून” आपल्या वॉल वर अवश्य शेयर करा. चुकीच्या लोकांच्या आहारी जाऊन अजाणतेपणे टीका करणाऱ्या, वाट चुकलेल्या लोकांना आपल्या पंतप्रधानाच्या दौऱ्याची आणि त्यातून होणाऱ्या त्यांच्या फायद्याची खरी माहिती देणं हे प्रत्येक भारतीयच कर्तव्य आहे.
©मंदार जोग