🩺हेल्थ मंत्र |आरोग्य मंत्र |🩺
रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक फायदे – ‘ही’ खास सवय आरोग्यासाठी गुणकारी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/9/2026 :
रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी आपण मुखवास, बडीशेप, गोड पानं असे अनेक इन्स्टंट रिफ्रेशमेंट देणारे पदार्थ खातो. पण जर याऐवजी आपण जेवल्यानंतर फक्त एक छोटीशी हिरवी वेलची चावून खाण्याची सवय लावली, तर ते आपल्या आरोग्यासाठी एक वरदान ठरू शकते. सगळ्या खड्या मसाल्यांच्या पदार्थांतील ही सुवासिक वेलची केवळ अन्नाची चवच वाढवत नाही, तर पचनक्रिया सुधारण्यापासून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यापर्यंत अनेक शारीरिक समस्यांवर रामबाण उपाय ठरते. आकाराने अगदी छोटी असली तरी वेलचीचा सुगंध, चव आणि तिचा पारंपरिक वापर अनेक वर्षांपासून भारतीय स्वयंपाकघराचा भाग आहे. चहा, मिठाई, खीर किंवा विविध पदार्थांची चव वाढवण्यासाठी वापरली जाणारी वेलची जेवणानंतरही अनेक घरांमध्ये खाल्ली जाते.
जेवणानंतर वेलची चावून खाण्याची पद्धत अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. तिच्या सुगंधामुळे तोंडाला फ्रेशनेस मिळतो, पण त्यापलीकडेही वेलचीमध्ये काही नैसर्गिक गुणधर्म भरपूर प्रमाणांत असतात. विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर वेलची खाण्यामुळे पचनाशी संबंधित काही त्रासांमध्ये मदत होऊ शकते. मग रात्री जेवल्यानंतर एक छोटीशी हिरवी वेलची (benefits of chewing cardamom daily) चावून खाल्ल्याने नेमकं शरीरावर काय परिणाम होतो? त्याचे कोणते फायदे होऊ शकतात आणि वेलची खाण्याची योग्य (benefits of eating cardamom after meals) पद्धत कोणती? ते पाहूयात…
रात्रीच्या जेवणानंतर हिरवीगार वेलची चावून खाण्याचे फायदे…
१. तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत :- रात्रीच्या वेळी खाल्लेल्या अन्नामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते, अशावेळी वेलची चावून खाल्ल्यास तोंडात फ्रेशनेस राहतो आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळतो. वेलचीचा सुगंध आणि तिच्यातील नैसर्गिक घटक जेवणानंतर तोंडाला फ्रेशनेस देण्यास मदत करू शकतात. त्यामुळे जेवणाचा वास कमी जाणवतो.
२. घशाला ताजेपणा मिळण्यास मदत :- जर तुम्ही रोज एक छोटीशी हिरवी वेलची चावून खात असाल, तर घशाला ताजेपणा जाणवू शकतो. जेवणानंतर एक छोटी वेलची हळूहळू चावून खाल्ल्याने तोंड आणि घशात फ्रेशनेस जाणवण्यास मदत होऊ शकते.
३. अन्न पचायला मदत करते :- वेलचीमधील सुवासिक तेल पाचक रसांच्या निर्मितला मदत करते, ज्यामुळे खाल्लेले अन्न लवकर आणि सहज पचते. जेवणानंतर वेलची चावून खाल्ल्याने पचनाशी संबंधित अस्वस्थता कमी होण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते. पारंपरिक पद्धतीनेही वेलचीचा वापर पचनासाठी केला जातो.
४. पचनक्रिया सुधारते :- जेवणानंतर वेलची खाल्ल्याने गॅस, अपचन, पोटदुखी आणि ॲसिडिटी यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. काही लोकांना जेवल्यानंतर गॅस किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं. अशावेळी वेलचीसारख्या सुगंधी मसाल्यांचा वापर आराम मिळवण्यासाठी केला जातो.
५. वजन नियंत्रित ठेवण्यास मदत :- वेलची चयापचय क्रिया (Metabolism) वेगवान करते, ज्यामुळे शरीरातील चरबी जाळण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
६. रक्ताभिसरण सुधारते :- वेलचीमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
७. तणाव कमी करून चांगली झोप लागते :- वेलचीचा सुवास आणि तिचे गुणधर्म मनाला शांत करतात, ज्यामुळे ताणतणाव कमी होऊन रात्री गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
८. तोंडातील लाळेचं प्रमाण वाढण्यास मदत :- वेलची चघळताना तोंडातील लाळ तयार होण्यास मदत होते. त्यामुळे जेवणानंतर तोंड कोरडं वाटत असल्यास फ्रेशनेस मिळवण्यास वेलची अतिशय फायदेशीर ठरते.
९. गोड खाण्याची इच्छा होईल कमी :- दररोज रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी काहीजणांना काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा (क्रेविंग) होत असेल, तर वेलची खाल्ल्याने याचे प्रमाण कमी होऊ शकते. तोंडाला वेलचीची हलकी गोड आणि सुवासिक चव लागताच जिभेवर एका वेगळीच चव रेंगाळत राहाते आणि यामुळेच जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा कमी होते.
♻️ ♻️