ज्येष्ठ सहकार नेते माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे दादांना राष्ट्रीय स्तरावरील जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/9/2026 :
इचलकरंजी येथे दादांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी आमदार प्रकाशअण्णा आवाडे, श्री दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालिका विनया घोरपडे, संचालक अमर यादव, उत्तम आवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अण्णांशी संवाद साधताना त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचा आणि आजही तल्लख असलेल्या स्मरणशक्तीचा पुन्हा एकदा अनुभव आला. जुन्या आठवणींना उजाळा देत अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा झाल्या. विशेषतः “सहकार, साखर कारखानदारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था” या विषयांवर सखोल चर्चा झाली.
काळ बदलला, अनेक पिढ्या बदलल्या; मात्र सहकार क्षेत्रासाठी आयुष्यभर केलेले कार्य आणि अनुभवातून आलेली दूरदृष्टी आजही प्रेरणादायी आहे. अशा ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वाशी संवाद साधताना नेहमीच काहीतरी नवीन शिकायला मिळते.
राष्ट्रीय स्तरावरील जीवनगौरव पुरस्काराने त्यांच्या प्रदीर्घ कार्याचा झालेला सन्मान हा सहकार क्षेत्रासाठीही अभिमानाचा क्षण आहे.
दादांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
स्थळ : इचलकरंजी
गणपतराव पाटील
प्रमुख, श्री दत्त उद्योग समूह, शिरोळ