विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत
नायकुडे, अकलूज.
दिनांक 06/02/2026 :
आपल्यामध्ये मी पणा, अहंकार वृथा असतो, ज्या मुळे माणसे दुरावतात. अनेकदा आपल्याला त्याचाच अभिमान वाटतो आणि आपण ते जोपासत असतो.
माझेच खरे, मीच खरा, मीच मोठा, मीच शहाणा, माझे सर्वांनी ऐकले पाहिजे, मी म्हणेन तसे वागले पाहिजे या भावनेतून आपण आपला अहंकार कुरवाळत बसतो व इतरांना कमी समजतो.
मुलांनो, थोड्या काळापुरता आपल्याला चांगले वाटले तरी त्यामध्ये आपले कायमस्वरूपी नुकसान असते. यामुळे आपण आपले जिवाभावाचे मित्र गमावतो. जवळची माणसे दुरावतात.
स्वतःला शहाणे समजण्याऐवजी, सर्वांबरोबर मिळूनमिसळून राहण्यात खरा शहाणपणा असतो.
सौ.स्नेहलता स. जगताप