मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 06/02/2026 :
जीवनामध्ये व्यवसायाने आपण कोणीही असलो तरी आपल्यामध्ये एक विद्यार्थी लपलेला असतो. आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण काही ना काही शिकत असतो.
त्याच वेळेस आपल्या प्रत्येकाच्यात एक शिक्षक पण असतो. आपण वेळोवेळी कोणाला ना कोणाला काहीतरी शिकवत असतो. आपण कोणत्याही भूमिकेत असलो तरी योग्य-अयोग्यची खात्री करत असतो.
शाळेत शिकणारे विद्यार्थी व शिकवणारे शिक्षक असेच काही नसते. आपल्यातील लपलेला विद्यार्थी व शिक्षक सदैव जागा असतो व तो असलाच पाहिजे.
आजचा संकल्प
जीवनात नवीन गोष्टी शिकण्यासाठी व आपले ज्ञान इतरांना देण्यासाठी आपल्यातील शिक्षक व विद्यार्थी कायम जागे ठेवू व आनंदात जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप