मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 10/02/2026 :
अनेकवेळा काही चर्चा होतात, संवाद होतात, वाद होतात आपण ऐकतो. कधी त्यावर विचार करतो कधी सोडून देतो. काही गोष्टी मनाला पटतात, काही मनाला पटत नाहीत. त्याप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया राहतात.
ज्या व्यक्तींची मते पटतात त्या व्यक्तींच्या बद्दल आपल्याला आदर वाटतो. ज्यांची मते न पटणारी, विरोधी वाटतात त्या व्यक्तींच्या बद्दल आपल्या मनात आकस राहतो. कधी त्याचा राग येतो तर कधी चीड.
अशावेळेस आपण त्या व्यक्तींशी बोलणे टाळतो, त्यांच्या विषयी चिडून बोलतो व ती व्यक्ती कशी वाईट आहे त्याची चर्चा करतो. खरे तर कोणतीच व्यक्ती पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नसते. त्या त्या विषयावरील त्यांची मते त्यांना चांगले किंवा वाईट म्हणवतात.
आजचा संकल्प
एखाद्या मुद्द्याच्या चर्चेवरून, त्यांनी मांडलेल्या मतांवरून एखाद्या व्यक्तीला चांगले किंवा वाईट न ठरवता त्यांचे इतरही गुण बघू व मनात आकस न ठेवता आपुलकीने वागू.
सौ. स्नेहलता स. जगताप