मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 11/02/2026 :
काही माणसांना दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देण्याची सवय असते तर काहीजण दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात स्वतःला धन्य समजतात. न मागता सल्ले देणारे किंवा टीका-टिपण्णी करणारे लोक कोणाला फारसे आवडत नाहीत.
त्याऐवजी हसून-खेळून, मिळून-मिसळून वागणारे लोक सर्वांना आवडतात. स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजणारे, आपल्याला सर्व काही समजणारे सर्वच बुद्धीमान असतात असे नाही.
आपल्या अपुऱ्या बुद्धीप्रमाणे कोणत्याही गोष्टींचा चुकीचा अर्थ काढून गैरसमज करून घेणारे अनेकजणांचा सरळ विचारांनी वागणाऱ्या लोकांना मानसिक त्रास होतो.
आजचा संकल्प
आपल्याला इतरांचा त्रास वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जो खटकणारा स्वभाव आहे तसे वागण्याचे आपण टाळू व एकमेकांशी चांगले संबंध ठेवू._
सौ. स्नेहलता स. जगताप.
====================