विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 11/02/2026 :
शाळेत आपण नियोजित अभ्यासक्रम शिकतो. त्याचा सराव करतो, भरपूर अभ्यास करतो, परीक्षा देतो, गुण मिळवतो. पुढील वर्गात जातो. पण आपण शाळेत फक्त यासाठीच जातो का?
आपले व्यक्तिमत्व इथे घडते. कसे वागावे, कसे बोलावे, परस्पर संबंध कसे असावेत हे आपण शाळेत शिकतो. माणूस म्हणून घडण्यासाठी शिक्षक आपल्यावर संस्कार करत असतात, मूल्ये रुजवत असतात.
मुलांनो, शाळेत जाऊन आपण फक्त क्रमिक पुस्तके न वाचता त्यातील धड्यांमधून जगण्यासाठी बोध (moral of the story) घ्यायचा असतो. त्यातून जीवनावश्यक धडे शिकायचे असतात.
मूल्याधिष्ठित शिक्षण ही संकल्पनाच अशी आहे की त्यामुळे मुले शिक्षित नव्हे तर सुशिक्षित घडतात.
सौ. स्नेहलता स. जगताप.