विचारधारा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 17/02/2026 :
आपल्या मनात काही व्यक्तींची प्रतिमा असते. त्यांना आपण आपला आदर्श समजत असतो. त्यांचे अनुकरण करणे, त्यांच्या प्रमाणे वागणे आपल्याला आवडते.
विशेषतः या वयात सिनेमात काम करणारे नट-नट्या आवडतात. त्यांच्यासारखी केशभूषा, वेशभूषा करायला आपल्याला आवडते. त्यांच्या स्टाईल मारण्याचा आपण प्रयत्न करतो.
मुलांनो, आपले आदर्श हे नकोत. समाज सुधारक, थोर विचारवंत, संत-महंत यांच्या विचारांनी आपण प्रभावित झाले पाहिजे. त्यांच्या प्रमाणे विचार करणे व वागणे महत्वाचे.
वरवरच्या असण्यापेक्षा तुमचे अंतरंग कसे आहे ते महत्वाचे.
सौ. स्नेहलता स. जगताप