मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 17/02/2026 :
आपण नेहमी म्हणतो,पेरावे तसे उगवते.
खरे आहे हे. जसे कर्म करू तसे फळ मिळते. पण त्यासाठी अगोदर पेरण्यापूर्वीची मशागत करावी लागते, पेरावे लागते, कर्म करावे लागते.
एखादे झाड लावायचे म्हटले तरी खड्डा खाणावा लागतो. खत, माती घालून तयार करावा लागतो. पुरेसे ऊन-पाणी लागते तेंव्हा कुठे रोप उगवते. त्याचा वृक्ष होण्यासाठी भरपूर काळ व मेहनत लागते.
आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सुद्धा आपल्याला अशीच तयारी करावी लागते. अंगणवाडी पासून पदवी पर्यंतचे शिक्षण, विविध क्षेत्रातील ज्ञान, अनुभव, व्यवहारज्ञान या गोष्टी अ पासून ज्ञ पर्यंतची माहिती मिळवावी लागते.
आजचा संकल्प
आपल्याला जे काही मिळवायचे किंवा प्राप्त करायचे ते मिळवण्यासाठी शून्यातून प्रयत्न करावे लागतात हे लक्षात घेऊ व त्याप्रमाणे प्रयत्नशील राहू._
सौ. स्नेहलता स. जगताप.
≈=================