मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
अकलूज दिनांक 16/02/2026 :
दैनंदिन जीवनात वावरताना आपण प्रत्येकजण भविष्याची चिंता करत असतो. पुढे कसे होईल या नादात आजचा, या घडीचा आनंद घेणे राहूनच जातो.
प्रत्येकाने भविष्याची तजवीज नक्की करावी. पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी आजचा दिवस चिंतेत व काळजीत घालवावा. पुढे घडणाऱ्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यासाठी चिंता करणे म्हणजे स्वतःच स्वतःचा आनंद हिरवणे असे होते.
आपले नियोजन व्यवस्थित असेल, कमाई पाहूनच खर्च असेल, विचार करून बोलणे असेल, स्वतःवर विश्वास असेल, चांगल्या सवयी असतील, माणुसकीने वागत असाल तर भविष्य चांगलेच असेल हे नक्की.
आजचा संकल्प
प्राक्तनात जे लिहिले असेल ते घडतच राहते, तसेच घडते. चिंता करून ते बदलत नाही. त्यामुळे नैतिकता जागृत ठेवून परस्परांशी वागू व वर्तमानातील वेळ समाधानात घालवू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
===================
.